||ॐ गं गणपतये नमः ||

|| प. पू. श्री स्वामी समर्थ महाराज || || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

गुरु शरणम् प्रार्थना आणि संकल्प

हरी ओम,

गुरुदेव करते करविते तुम्ही आहात, मी फक्त निमित्तमात्र आहे, मी तुमच्या चरणी शरण आलो आहे, तुमचा आशीर्वाद पाठिशी असूदे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पड़ावा,

गुरुदेव, माझ्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास झाला, माझ्यामुळे ज्यांना ज्यांना दुःख पोहोचले त्या सर्वांची मी माफी मागतो, मला क्षमा करा.

गुरुदेव, ज्यांच्या मुळे मला त्रास झाला आणि ज्यांच्या मुळे मला दुःख पोचले, त्या सर्वांना मी क्षमा करतो.

सृष्टीतील सर्व घटक महत्त्वाचे आणि आदरणीय आहेत. मी एक सर्वसाधारण माणूस आहे, तुमचा आशीर्वाद पाठिशी असू देत.

सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी, शांती आणि समाधान लाभो.

प. पु. श्री श्री श्री स्वामी योगेश्वर (पीठाधीश्वर)

((अनंत सत्याच्या शोधात दिव्य प्रकाश)