मोक्ष प्राप्तीतून पर्यावरण संतुलन
प्रिय साधक,
मनुष्य त्याचे कर्माचे ओझे आणि अतृप्त इच्छा घेऊन जन्माला येतो, त्या कर्माचे ओझे फेडताना पर्यावरणाची विविध संसाधने वापरतो. त्याने जर जन्म जगताना स्वतःच्या इच्छा पूर्ण करून आणि कर्मबंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त केला नाही तर असा माणूस त्याची उरलेली कर्मे आणि इच्छा भोगण्यासाठी सृष्टीमध्ये परत जन्म घेतो. असा जन्म-मृत्यूच्या फेर्यात अडकलेला मनुष्य प्रकृती आणि तिच्या संसाधनांसाठी भार बनतो आणि प्राकृतिची संसाधने बेजबाबदारपणे परतपरत वापरून प्राकृतिचे संतुलन बिघडवतो.
जबाबदार नागरिक व्हा. कर्मबंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करा आणि प्रकृतिवरचा तुमचा भार कमी करून प्रकृतीचे संतुलन निर्माण करण्यास आपला हातभार लावा.
श्री दत्त गुरुपीठाच्या 'साक्षी' या निस्वार्थ सेवा संकल्पात सहभागी होऊन,मोक्ष प्राप्तीच्या दिशेने आजच वाटचाल सुरु करा.
चला, भ्रममय सागर (भवसागराच्या) पलीकडे पोहोचण्यासाठी ही दिव्य यात्रा सुरू करूया…..
