अव्यक्त, अनंत, शाश्वत अक्षर ब्रह्माचे अधिष्ठान! भगवंत म्हणतात, ज्या सनातन, अव्यक्त, आणि अक्षरभावाला प्राप्त करून मनुष्य जीवात्मा परत येत नाही (या संसारात पुन्हा पुन्हा फिरून जन्म घेत नाही) तेच माझे धाम, परामधाम.
तुम्ही येथे पोहोचलात ही दैवी इच्छा आहे.
आताच संपर्क करा आणि संकल्प मंत्र दीक्षा घेऊन मोक्ष प्राप्तिची सिद्ध महायोग साधना सुरू करा
संपर्क : मोबाइल- +91 9370 384 379 (श्री श्री श्री स्वामी योगेश्वर (पीठाधीश्वर))
श्री दत्त गुरुपीठ परमधाम
कर्म बंधनातून मुक्त व्हा आणि मोक्ष प्राप्त करा
श्री दत्त गुरुपीठ हे 'प. पू. श्री महागुरू दत्तात्रेय' यांचे संपूर्ण विश्वातील पहिल्या प्रकाराचे जागृत दैवी स्थान (गुरुपीठ) आहे. “श्री दत्त गुरुपीठ” हे महागुरु शक्तीपीठ, ज्ञानपीठ आणि भक्तीपीठ यांचा परिपूर्ण त्रिवेणी संगम दर्शविते.
वैश्विक नारा - एकच ध्येय, एकच ध्यास, मोक्ष प्राप्तीसाठी करू प्रयास.
प्रतिबद्धता - घराघरात प्रत्येकाच्या मुखात मोक्ष प्राप्तीसाठी महामंत्राचा घोष. मी या प्रकृतीवरचा माझा कर्माचा भार कमी करण्यास कटिबद्ध आहे. माझा भार माझी जबाबदारी आहे.....असा तो कर्मबंध मुक्त, जीवन मुक्त भारतीय, तो भारत रत्न आणि म्हणून मला मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.
उद्देश - ईच्छूक साधकांसाठी
‘श्री दत्त गुरुपीठ’ स्थापन करून गुरुपीठाच्या महा संकल्पाने महायज्ञ प्रज्वलित करणे जेणेकरून साधकांना आत्म-मुक्तीच्या (मोक्ष) मार्गावर त्यांची इच्छापूर्ती करताना दिव्यप्रकाश अनुभवायला मदत होईल.
माणसाच्या जीवनाचा परम उद्देश (मोक्ष प्राप्ती) साध्य करण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनासाठी "सनातन दैवी बुद्धी संस्था ('सनातन इन्स्टिट्यूट ऑफ डिव्हाईन इंटेलिजन्स (S I D I)" ही संस्था स्थापन करणे.
प. पू. श्री महागुरु दत्तात्रेयांच्या मंत्र दीक्षेतून आत्म-मुक्ती (मोक्ष) साधण्याचे प्राचीन तंत्रज्ञान साधकांपर्यंत पोहोचवणे.
'आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गुरुपीठाच्या अनुयायांसाठी 'साक्षी' हा 'निस्वार्थ' आणि 'निरपेक्ष' सेवा मंच स्थापन करणे, जेणेकरून गुरुपीठाचे अनुयायी प्रकृती आणि समाजाप्रती त्यांच्या कर्तव्यांचे पालन करून त्यांच्या भूतकाळ, वर्तमान आणि चालू आयुष्याच्या कर्मांचे निवारण करू शकतील.
मोक्ष कार्यक्रमाद्वारे पर्यावरणीय शाश्वतता सक्षम करणे.
स्व-धर्म प्रजा समाजासह सर्वांमध्ये एकत्व अनुभवणारा तत्त्वांवर आधारित मानव समाज स्थापन करणे. (अद्वैत)
आमच्या 'सनातन इन्स्टिट्यूट ऑफ डिव्हाइन इंटेलिजन्स - SIDI' मध्ये आजच सामील व्हा. 'SIDI' हा मानव रूपात असतानाही आत्म-मुक्ती (मोक्ष) हा सर्वोच्च उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा दैवी शिडी आहे. सिद्ध महायोग साधना आणि 'साक्षी नि:स्वार्थ सेवा मंच' तुम्हाला तुमच्या भूतकाळ आणि वर्तमान जीवनातील कर्मकायबंधापासून मुक्त होण्यासाठी आणि आत्म-मुक्ती (मोक्ष) प्राप्त करण्यासाठी मदत करतील.
ईच्छूक साधक -
ज्यांना जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचे आहे.
ज्यांना दुःख आणि सुखाच्या जीवनापासून मुक्त व्हायचे आहे.
ज्यांना त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील कर्मांपासून मुक्त व्हायचे आहे (संचित, प्ररब्ध आणि वर्तमान जीवनातील चालू कर्म जाळा).
जे आत्मसाक्षात्कार, 'मी कोण आहे?' या प्रश्नाचे उत्तर मिळवू इच्छितात आणि आत्मज्ञान आणि मुक्ती (मोक्ष) प्राप्त करू इच्छितात.
ज्यांना त्यांच्या कुटुंब, मित्र आणि प्रियजनांच्या हितासाठी दैवी आशीर्वाद हवे आहेत.
जे साधक स्व-मुक्तीद्वारे पर्यावरणीय टिकावासाठी योगदान देऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी.
ज्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट आणि वर्क-लाइफ बॅलन्स व्यवस्थापित करायचे आहे.
ज्यांना मानसिक शांती आणि शाश्वत आनंदासाठी ध्यान करायचे आहे.
ज्यांना सत्संग आणि निःस्वार्थ सेवा करून सांसारिक आणि योगी जीवनशैलीत संतुलन साधायचे आहे.
ज्यांना ‘सनातन इन्स्टिट्यूट ऑफ डिव्हाइन इंटेलिजन्स’ (SIDI) सोबत अंतर्मुखी दिव्यता अनुभव करायची आहे.
निरपेक्षा तुळशी तत्त्वज्ञान आत्मसात करूया - सहनशील, संवेदनशील, समजदार, समजूतदार, सर्वसमर्पकता, सहिष्णुता, सकारात्मकता, समर्पित, सर्वसमावेशक, सुशिक्षित, सदाचार, सुसंस्कृत.






Divine Mother Mary : Kamadhenu Gayatri Mata
प. पू. श्री स्वामी समर्थ महाराज
प. पू. महागुरु श्री दत्तात्रेय
पीठाधीश्वर प. पू. श्री श्री श्री स्वामी योगेश्वर


Spirituality is beyond any religion, cast, color, country, or any sort of discrimination. Spirituality teaches us to live with principles and experience Prabhu in all as oneness. Divine Mother enables all possible resources for her children to fulfill their desires, without any discrimination. She is Divine Mother Mary, Kamadhenu Gayatri Devi.
- Amen.
- Hari OM.
It is divine will that you have arrived here at Shree Datta Gurupeeth ParamDham. Avail 'Sankalpa Mantra Diksha' today and start your spiritual sadhana and journey towards self-liberation (Moksha)
